औरंगाबाद – घरात लगीनघाई सुरु असताना वधुपित्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ब्रिजवाडी येथे बुधवारी रात्री नागेश काशीनाथ आठवले (३४) यांनी घरातील छताच्या लोखंडी रॉडला साडीने गळफास तयार करुन आत्महत्या केली आहे. मुलीचे लग्न चार दिवसांवर आले असताना पैशांची जमवाजमव होत नसल्यामुळे आर्थिक विपन्नावस्थेला कंटाळून नागेश आठवले यांनी आत्महत्या केल्याचे समोर येत आहे.
घरात सर्व नातावाईक झोपलेले, त्याने साडीचा
बनवला गळफास
ब्रिजवाडी येथे राहाणारे नागेश भोसले यांना
तीन मुले आहेत. त्यांच्या मोठ्या मुलीचे लग्न १८ नोव्हेंबर रोजी होणार होते.
यासाठी नातेवाईकही घरी आलेले होते. बुधवारी रात्री कामावरुन घरी आल्यानंतर नागेश
यांनी सर्वांसोबत बातचीत केली आणि सर्वजण झोपल्यानंतर त्यांनी रात्री १०च्या
सुमारास घराच्या छताला साडीचा गळफास बनवून आत्महत्या केली. कुटुंबियांचे हे लक्षात
आल्यानंतर त्यांना तत्काळ खाली उतरवून घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
खासगी ट्रॅव्हल्समध्ये करत होते काम
मुलीच्या लग्नासाठी आवश्यक तो खर्च करु शकत
नसल्याच्या विवंचनेतून नागेश यांनी आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज
पोलिसांनी वर्तवला आहे. नागेश हे मध्यवर्ती बसस्थानक येथील एका खासगी ट्रॅव्हल्स
एजन्सीमध्ये कामाला होते. नोकरीतून मिळणाऱ्या उत्पन्नात तीन मुले आणि पत्नी यांचे
पालन पोषण करणे अवघड होते. मोठ्या मुलीचे लग्न ठरले परंतू लग्नासाठी लागणारा
आवश्यक खर्चाची तरतूद होऊ न शकल्याने त्यांनी आत्महत्या केली असण्याची शक्यता
त्यांच्या नातेवाईकांनी वर्तवली आहे.












